दारू का पिता?असे विचारणाऱ्या मुलांवर बापानेच केला चाकूने हल्ला

दारूमुळे संसार उध्वस्त होतात, कुटुंबे बरबाद होतात, दारूच्या नशेत हातून अनपेक्षित कृत्य घडते. अश्या अनेक घटना आपल्याला रोज कुठे न कुठे घडल्याचे वाचायला मिळते. अशीच एक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली. इथे मात्र वडिलांनी मुलांना समजविण्याऐवजी मुलांनी दारू पिणाऱ्या बापाला समजवण्याचा प्रयत्न केला. दारू का पिता, दारू पित जाऊ नका असे मुलांनी सांगितल्याचा राग आल्याने…

Read More

नोकरी टिकवायची असेल तर पैसे द्या, शिपायाकडून मुख्याध्यापकाने घेतली लाच..

आपला भाऊ चेअरमन असल्याचे धमकावून शिपायांकडून पैशांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. हि घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील नागरी एज्युकेशन सोसायटी बॉईज हायस्कुल येथे घडली. धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हि कारवाई केली.आपल्या भावाची संस्थेच्या चेअरमन पदावर निवड झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर, शाळेतील प्रत्येक शिपायाला…

Read More

धुळ्यात मसाल्यात भेसळ करणारे रॅकेट उघड

एमआयडीसीत सुरु होता कारखाना, एलबीसीची मोठी कारवाई, अधीक्षक धिवरेंनी दिली भेट धुळे येथील अवधान शिवारात असलेलया एमआयडीसीमध्ये धाड घालून खाद्य पदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या लाल मसाल्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करणारे रॅकेटपोलिसांनी उघड केले आहे. यासंदर्भात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एमआयडीसीमधील कंपनीच्या एका भाड्याच्या गाळ्यात हा गोरख धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे आणि…

Read More

शिंदखेडा तालुक्यात भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

शिंदखेडा – कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांच्या इको कार व बोलेरो पिकअप व्हॅन यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल…

Read More

कल्याणमध्ये दागिन्यांची चोरी, तृतीयोपंथीय चोरट्यांची टोळी सक्रिय

ल्याण-डोंबिवली परिसरात तृतीयपंथी चोरांची टोळीच सक्रिय झाली आहे. गणेश उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरून बाप्पाच्या मूर्तीसमोर नाचत चक्क घराटाळ्या दागिन्यांवरच ते डल्ला मारत आहेत. विशेष म्हणजे दागिने पळवल्यावर ते घरच्यांकडून पैशांची मागणी देखील करत आहेत.कल्याणच्या वाडेघर परिसरात अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र पाटील यांच्या घरात ४ ते ५ तृतीयपंथीयांनी शिरत गणपतीच्या बाजूला…

Read More

दोंडाईचा गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च…

गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहरात पोलिसांनी रूट मार्च केले. शहरातील मानाच्या गणपती विसर्जन मार्गावर तसेच संवेदनशील भागात रूट मार्च करण्यात आला होता. रुट मार्च हा पोलीस ठाणे पासून सुरू होऊन गोविंद नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अभिषेक चित्रमंदिर, भोई वाडा, आझाद चौक, सोनार गल्ली मार्गे एकता चौक करून पोलीस ठाणे येथे समाप्त झाला. गणेशोत्सव काळात…

Read More

जुने कोळदे हातभट्टीवर दोंडाईचा पोलिसांची कारवाई…

दोंडाईचा- जुने कोळदे ता. शिंदखेडा येथे काटेरी झाडाझुडुपांच्या अडोक्यात विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूवर कारवाई करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी हातभट्टीची उग्र वासाची कच्ची दारू पन्नास रुपये लिटर प्रमाणे एकूण पाच ड्रम प्रत्येकी ड्रम मध्ये 20 लिटर कच्ची हातभट्टीची दारूचा मुद्देमाल कारवाई करत नष्ट करण्यात आला आहे. आकाश सुरतसिंग भिल रा. जुने कोळदे…

Read More

दोंडाईचात रावल दूध संघातून दोन लाखाचे दूध तपासणीचे फॅट मोजण्याच्या मशीनची चोरी

दोंडाईचा – शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडणे ही नित्याचीच बाब झाली आहे. बुधवारी शहरातील शहादा रस्त्यावरील दूध संघातून फॅट मशीन चोरीची घटना घडली. चोरीच्या वाढलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे.याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात अमरदिप प्रभाकर पाटील(रा. विद्यानगर दोंडाईचा ता. शिंदखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दादासाहेब रावल दूध उत्पादक संघात परिसरातील दुधाचे संकलन केले जाते. दूधाची…

Read More

बदलापूर घटनेतील दोषींना फासावर लटकवा आ.कुणाल पाटील

महाविकास आघाडीतर्फे धुळ्यात निषेध आंदोलन धुळे- महाराष्ट्रात अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे, बदलापूर घटनेप्रकरणी सत्ताधार्‍यांच्या भावना बोथड झाल्या असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बदलापूर येथील दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणार्‍या दोषींना तत्काळ फासावर लटकवा अशी मागणी करीत आ.कुणाल पाटील यांनी बदलापूर घटनेचा निषेध केला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनेच्यावतीने आज…

Read More

निर्लज्जपणाचा कळस, 2 लाखांची घेतली लाच,

धुळ्यात जि.प. शिक्षण विभागातील अधिक्षिका मीनाक्षी गिरी यांना रंगेहात पकडले धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिक्षिका मीनाक्षी भाऊराव गिरी यांना चक्क 2 लाख रुपयांची लाच घेताना आज 20 ऑगस्ट रोजी रंगेहात पकडण्यात आले. श्रीमतीगिती यांच्याकडे वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालायचाही अतिरिक्त पदभार आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी महानगर पालिकेच्या हायस्कुल मध्ये विशेष शिक्षक…

Read More
Back To Top