
सहा वर्षांपासून फरार असलेला दरोड्याचा आरोपी अखेर दोंडाईचा पोलिसांच्या ताब्यात
दोंडाईचा: सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर दोंडाईचा पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर दोंडाईचा पोलीस ठाणे आणि नंदुरबार रेल्वे पोलीस ठाणे येथे चार गंभीर गुन्हे दाखल असून निलेश खंडू संसारे (रा. डालडा घरकुल, दोंडाईचा; ह.मु. आखातवाडे, शनिमंडळ, ता. जि. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुलीजवळ…