
खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे : पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील निगडी, प्राधिकरण येथे खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची उजळणी करताना विविध मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” या स्वागतगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने…