शेतीच्या मशागती वेळी विज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील घटना…

शिरपूर तालुक्यातील ताजपूरी येथील शेतात मशागतीचे काम करत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत नथ्थू हारचंद्र सनेर (रा. ताजपूरी) यांचा जागीच मृत्यू झाला. नथ्थू सनेर हे आपल्या आढे शिवारातील शेतात मशागतीचे काम करीत होते. दुपारच्या सुमारास ते पाणी पिण्यासाठी थोडा वेळ बसले असता अचानक त्यांच्यावर आकाशातून वीज कोसळली. वीजेचा जबरदस्त…

Read More

शिरपूर – निमगूळ येथील जवान महेश सोनवणे यांचे अपघाती निधन; संपूर्ण गावावर शोककळा

दोंडाईचा- (श. प्र.) निमगूळ ता. शिंदखेडा येथील रहिवासी सध्या शिरपूर (जि. धुळे) येथे वास्तव्यास असलेले आर्मी सिग्नल कोर यात हवालदार म्हणून मध्यप्रदेश महू ( इंदोर) येथे कार्यरत असलेले महेश युवराज सोनवणे हे सुटीवर आपल्या दुचाकीने शिरपूर येथे येत असताना दि. ६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास लवकी (ता. शिरपूर) जवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने…

Read More

धुळे शारदा बागुल हत्याप्रकरण – सुपारी देऊन हत्या प्रकरणात 9 आरोपी गजाआड; एक फरार

धुळे, ५ जून : पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत ३० मे रोजी घडलेल्या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये पतीसह कुटुंबीयांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून अखेर सुपारी देऊन तिचा खून केल्याचे समोर आले असून एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार…

Read More

ट्रॅक्टर खाली दाबले गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू

जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एमआयडीसी खादगाव ते आंबीलहोळ रस्त्यावर आज २० मे रोजी दुपारी दुर्दैवी अपघात घडला. ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन खोल खड्यात कोसळले. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक गुलाब जमा चव्हाण (वय ३५) यांचा ट्रॅक्टरच्या खाली दबून जागीच मृत्यू झाला.ट्रॅक्टर उलटल्यामुळे गुलाब चव्हाण हे वाहनाबरोबर खालच्या खड्यात पडले. ट्रॅक्टर पूर्णपणे त्यांच्या अंगावर गेल्याने या अपघातात…

Read More

नाशिकमध्ये भीषण अपघात : भरधाव पिकअपने दिली धडक,बहिणीने भावासमोर सोडला जीव

नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याने एक तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सोनवणे ही तरुणी आपल्या भावासोबत दुचाकीवरून जात होती. दरम्यान, मागून…

Read More

ट्रॅक्टरच्या गिअरवर पाय पडल्याने, दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू

ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात… सोलापुरातील मोहोळ येथे धक्कादायक घटना घडलीय. ऊसतोड मजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील दोघी बहिणींचा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे .चार वर्षाच्या लहान बहिणीला कडेवर घेत ट्रॅक्टरवर चढताना मोठ्या बहिणीचा पाय गेअरवर पडल्यानं हा अपघात घडला आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत ऊस तोडीच्या फडात शनिवारी ही घटना घडली.निता…

Read More

पांझरा नदी पुलावर डीजे वाहन आणि दुचाकीचा अपघात ; दुचाकी चक्काचूर पण सुदैवाने जीवित हानी टळली

धुळे शहरातील नकाणे रोडलगत पांझरा नदी पुलावर डीजे वाहन एका दुचाकी वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी हि घटना घडली. गाडीचा अचानक ब्रेक न लागल्याने ती जागेवरच पलटी झाली आणि दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डीजे वाहन आणि एक्टिवा दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे….

Read More

हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग ; 10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी

झांसीमध्ये घडली मनाला हादरवून टाकणारी घटनाहॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी उत्तर प्रदेशच्या झांसीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. हि आग लहान मुलांच्या वॉर्डमध्ये (NICU) लागली असता या दुर्घटनेत 10 मुलांचा मृत्यू झाला तर 16 जखमी झाले आहेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये…

Read More

जळगावमध्ये वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट : तिघांचा मृत्यू , दहा जण गंभीर जखमी

जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे घरघुती गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेमध्ये १० जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व संदीप सोपान या तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले. घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची किंमत कमी असल्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा…

Read More

धुळ्यात भीषण अपघात, 3 जण जागीच ठार, 5 जण जखमी

धुळे – शहरातील नगावबारीनजीक अजमेरा महाविद्यालयाजवळ आज रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात बस वाहकासह तीन जण जागीच ठार झाले. तर बस चालकासह पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत. सर्वांना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भयंकर होता की बसचा काच फुटून बस वाहक थेट बाहेर फेकला जावून बस…

Read More
Back To Top