धुळे जिल्ह्यात ७ ट्रकद्वारे अवैधरित्या सुपारी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; २.५ कोटींचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने केली मोठी कामगिरी धुळे जिल्ह्यात सुपारीच्या अवैधरित्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल २.५२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून अवैध माल घेऊन जाणाऱ्या ७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले असून, कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात ३० एप्रिल…

Read More

मासिक पाळीमध्ये स्वयंपाक केल्यावरून वाद विकोपाला, 26 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूने खळबळ

जळगाव | जळगाव तालुक्यातील किनोद येथे २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) या महिलेचा खून करण्यात आला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून, प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.गुरुवारी (१ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास…

Read More

‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञे’ द्वारे जनजागृती करावी

सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे मीना भोसले यांचे आवाहन धुळे : ‘अक्षयतृतीये’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी ब्राह्मण, भटजी, मौलवी, धर्मगुरू यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेणार आहोत. या घटकांनी ‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन शहरातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीना भोसले यांनी सोमवारी 28 एप्रिलला साक्री रोडवरील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

साक्री तालुक्यात तीन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

साक्री : दातरती, वाजदरे आणि बळसाणे शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने शनिवारी कारवाई केली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कार्यवाही केली. जिल्हाधिकारी धुळे यांच्या निर्देशानुसार तालुक्यात अवैध गुणखनिज वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे नेतृत्व साखरी तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी करत आहेत. शनिवारी…

Read More

पिंपळनेर खून प्रकरण: आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या आंबापाडा गावात ३० सप्टेंबर २०२१ रोजी घडलेल्या खून प्रकरणात आरोपी गुलाब बंडू बागुल यास धुळे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात मयत सुमनबाई बंडू बागुल यांच्या मुलाने, म्हणजेच आरोपी गुलाब बागुल याने दारूसाठी आईकडे पैसे मागितले. मात्र तिने पैसे नाकारल्याने रागाच्या भरात त्याने हाता-बुक्क्यांनी…

Read More

धुळे जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक व बोगस माध्यमिक शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करुन गुन्हे दाखल करा

शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी धुळे – बोगस शिक्षक भरती व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांना हाताशी धरून, संस्था चालकांनी घातलेला हैदोस, संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना माझे जाहीर आवाहन आहे. अशा नकली चौकशांचे नाटक बंद करा ! दोषी व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते, माजी आमदार…

Read More

राजेंद्र बंब प्रकरणात सरकारी वकील बदलण्याची मागणी

तक्रारदार जयेश दुसाणे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन धुळे – आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सावकारी प्रकरणात आरोपी राजेंद्र जिवनलाल बंब व संजय जिवनलाल बंब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, या प्रकरणातील तक्रारदार जयेश उमाकांत दुसाणे यांनी सदर गुन्ह्यातील सरकारी वकील बदलून MPSC मार्फत नियुक्त सरकारी वकील नेमण्यात यावा, अशी मागणी करत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन…

Read More

समाज माध्यमांद्वारे उध्दव ठाकरे यांची बदनामी करणा-यां विरूध्द कायदेशीर कारवाई करा

धुळे जिल्हा शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जगदिश सुर्यवंशी यांची मागणी धुळे – फेसबुक वर ‘वेद कुमार‘ व ‘गणेश मोहन कराड‘ या खात्याद्वारे चालविला जाणारा ‘देवेंद्र फडणवीस‘ या नावाचा ग्रुपवर शिवसेना पक्ष, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबियां विरूध्द बदनामी करण्यात आली आहे. या संदर्भात धुळ्यात जिल्हा शिव विधी व…

Read More

धुळ्यात मिशन सायबर सेफ खान्देश, ही राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

ही केवळ परिषद नाही, तर “सायबर सेफ इंडिया” या ध्येयाकडे वाटचाल करणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल – अॅड. चैतन्य भंडारी धुळे :- येथे पार पडलेली सायबर कॉन्क्लेव 1.0 – मिशन सायबर सेफ खान्देश, ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. ही परिषद सायबर कायदा आणि सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्याच्या उ‌द्देशाने सायबर अवेअरनेस…

Read More

गुप्त माहितीवरून वनविभागाची कारवाई: पिकात साठवलेला ५५ लाखांचा सुका गांजा जप्त

अंबा (ता. शिरपूर), सांगवी वनविभागातील परिमंडळ खंबाळा येथील नियतक्षेत्र अंबा मधील कक्ष क्रमांक ८३३ मध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मका, ज्वारी, बाजरीच्या मिश्र उभ्या पिकामध्ये लपवून ठेवलेला सुका गांजा साठा गुप्त माहितीनंतर जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे ११०० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण बाजारमूल्य सुमारे ५५ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. नेहमीप्रमाणे गस्त…

Read More
Back To Top