
चौथी मुलगी झाल्याने आईनेच घेतला नवजात चिमुरडीचा जीव
राज्य सरकार ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करत असतानाही मुलींच्या जन्माला असणारा विरोध अद्यापही संपलेला नाही, याची धक्कादायक प्रचिती पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात आली आहे. डहाणू शहरातील लोणीपाडा भागात चौथे अपत्यही मुलगी झाल्याच्या नैराश्यात एका आईने आपल्या नवजात चिमुरडीचा गुदमरवून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (२६ एप्रिल)…