
महाराष्ट्र

माजी आ.प्रा. शरद पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत प्रवेश
धुळे तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार तथा नंदुरबारजिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शरद पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ना.अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत आज ३ मे रोजी हा प्रवेश सोहळा झाला. प्रा. शरद पाटील यांनी दुसऱ्यांदा शिवसेना सोडली.धुळे तालुक्यातील कुसुम्ब गावात एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या…

धुळे जिल्ह्यात ७ ट्रकद्वारे अवैधरित्या सुपारी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; २.५ कोटींचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेने केली मोठी कामगिरी धुळे जिल्ह्यात सुपारीच्या अवैधरित्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल २.५२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून अवैध माल घेऊन जाणाऱ्या ७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले असून, कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात ३० एप्रिल…

खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे : पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील निगडी, प्राधिकरण येथे खान्देश मराठा मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची उजळणी करताना विविध मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” या स्वागतगीताने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने…

मासिक पाळीमध्ये स्वयंपाक केल्यावरून वाद विकोपाला, 26 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूने खळबळ
जळगाव | जळगाव तालुक्यातील किनोद येथे २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) या महिलेचा खून करण्यात आला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून, प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.गुरुवारी (१ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास…

नाशिकमध्ये भीषण अपघात : भरधाव पिकअपने दिली धडक,बहिणीने भावासमोर सोडला जीव
नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याने एक तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सोनवणे ही तरुणी आपल्या भावासोबत दुचाकीवरून जात होती. दरम्यान, मागून…

“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!”अभियानाचा धुळे जिल्ह्यात शुभारंभ
आ.काशीराम पावरा, आ.मंजुळा गावित यांच्यासह लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यात दिनांक १ मे २०२५ रोजी “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष अभियानाची सुरुवात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली . या अभियानाच्या निमित्ताने शिरपूरचे आमदार काशीराम पावरा साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग…

जिल्हा क्रीडा व युवा पुरस्कार जाहीर; 1 मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण
धुळे – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे 2023-24 व 2024-25 या वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार तसेच युवक, युवती व संस्थांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस कवायत मैदान, धुळे येथे जिल्ह्याचे…

मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन होणार शेगावात
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली पहिली आढावा बैठक मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन यंदा बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम. देशमुख यांनी केली आहे. अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगाने झालेली पहिली आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.ही महत्वपूर्ण बैठक शेगाव येथे प्रत्यक्ष भेट…

धुळ्यात घरपट्टी, पाणी पट्टीचे मिळेल आता एकच बिल
महापालिका प्रशासनाचा निर्णय धुळे : महापालिकेतर्फे गेल्या – काही वर्षांपासून पाणीपट्टी व – घरपट्टीसाठी स्वतंत्र बिल दिले जात होते. यात मालमत्ता करावर दरमहा २ टक्के शास्तीची आकारणी केली जात आहे. यामुळे मालमत्ता धारकांकडून फक्त घरपट्टीचा भरणा केला जात होता तर पाणीपट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र होते. त्यामुळे महापालिकेने पाणीपट्टी व घरपट्टीचे बिल एकत्र देण्याचा…

‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञे’ द्वारे जनजागृती करावी
सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे मीना भोसले यांचे आवाहन धुळे : ‘अक्षयतृतीये’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी ब्राह्मण, भटजी, मौलवी, धर्मगुरू यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेणार आहोत. या घटकांनी ‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन शहरातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीना भोसले यांनी सोमवारी 28 एप्रिलला साक्री रोडवरील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत…