येवल्यात दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, एक जण जागीच ठार
दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना येवला-कोपरगाव रस्त्यावर घडली. अशपाक इब्राहिम शाह असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. नानासाहेब गुळवे असे अपघातातील जखमी मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. जखमीवर येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर, त्याला कोपरगाव येथे पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशपाकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी…
