
फळ विक्रेत्याची 2 मुलांसह आत्महत्या; 21 सावकारांवर गुन्हा, 10 जणांना बेड्या
नाशिकच्या सातपूर परिसरात एका फळ विक्रेत्यांने आपल्या दोन मुलांसह सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या शिराेडे कुटूंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. यामध्ये पित्यासह दाेन सख्या भावाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने परिसरावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान शिराेडे पिता पुत्रांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या…