
पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून,कुलीडाबर ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तळोदा तालुक्यातील कुलीडाबर गावाला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले होते.तळोदा तालुक्यातील कुलीडाबर हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अतिदुर्गम भागातील सुमारे 300 लोकसंख्या असणारे गाव आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील या गावाला जोडणारा पक्का…