
राजकीय

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कडून तीन तास चौकशी
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आज अमरावतीतील ‘एसीबी’ कार्यालयात ते तीन तास चौकशीत होते. नितीन देशमुख हे चौकशीत असताना ठाकरे गटाच्या एसीबी कार्यालयाचा बाहेर घोषणाबाजी आणि सोबतच शक्ती प्रदर्शन हि केले. देशमुख सकाळी दहाच्या सुमारास अकोल्यातून अमरावती जाण्यासाठी निघाले. देशमुख एकटे नव्हे तर सोबत पाचशे होऊन अधिक कार्यकर्ते अमरावती ला गेले होते. देशमुख यांना अटक होईल…

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मुले राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज ११:३० ला चा प्रकार घडला. नागपुरातील त्यांच्या कार्यलायत धमकीचे ३ वेळा फोन आले. हा प्रकार झाल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहे….

भारत जोडो यात्रे दरम्यान खासदार संतोख सिंह चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू
भारत जोडो यात्रा हि भारतात मागील काही महिन्यापासून चर्चेचा विषय ठरत आहे ‘भारत जोडो’ यात्रा सध्या पंजाबमध्ये सुरु आहे. आज यात्रे दरम्यान दुख:द घटना घडली काँग्रेसचे खासदार संतोख सिंग चौधरी यांचे हृदयविकाराने आज पंजाब भारत जोडो यात्रेत आज निधन झाले. सकाळी फिलूर येथे पदयात्रेला प्रारंभ झाला तेव्हा संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले….

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आज मुंबई मेट्रो लाइन 2A आणि 7 चा आढावा घेणार…
मुंबई : पुढच्या आठवड्यात मुंबई मेट्रो लाइन 2A आणि 7 अधिकृत उद्घाटनापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी लिंकवरून जाणाऱ्या नवीन मुंबई मेट्रो लाईन्स – 2A (DN नगर अंधेरी ते दहिसर) आणि 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) चा आढावा घेतील. रस्ता आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग – अंधेरी पूर्व येथील गुंदवली…

भाजपची साथ सोडल्यास शिंदे गटासोबत युतीस तयार, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी बैठक घेतली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील संभाव्य युतीबाबत चर्चेला सुरुवात झाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिंदे गट भाजपची साथ सोडत असेल तर त्यांच्यासोबत आम्ही युती करायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली ला भेट झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि शिंदे…

काँग्रेस नेते जयप्रकाश छाजेड यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
नाशिक : काँग्रेसचे माजी आमदार व इंडियन नॅशनल ट्रेड युनियनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अचानक छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना नाशिक मधील सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, रात्री दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांची पत्नी व नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची छापेमारी
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने आज सकाळी छापे टाकले. त्यामुळे कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. नंतर आता यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरांवर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरांवर ईडीची छापेमारी सुरू आहे. माझ्या…

शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार रविवारी पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय मैदानात चर्चांना सुरुवात झाली आहे. तसेच ही नव्या राजकारणाचा खेळ तर नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. असाच प्रश्न भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावर…

भाजप नेते नीलेश राणे यांची रोहित पवारांवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली. यावर आमदार रोहित पवार यांचे क्रिकेटमधील योगदान काय, हे समजले नाही, अशी टीका भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केली आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण मात्र,…

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाने साधला एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
मुंबई : भाजपचा कथित कट उधळून लावा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या आणि रोजीरोटी वाचवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केली..2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने आपली गणिते सुरू करून दिलेली आहेत. म्हणूनच गेल्या 60 वर्षात मराठी माणसाच्या रक्त आणि घामाने निर्माण केलेली महाराष्ट्राची संपत्ती हिरावून घेण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.