सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही पटोले यांनी व्यक्त केली.


मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे उमेदवारी करणाऱ्या ऍड. उज्ज्वल निकम यांचा महाविकास आघाडीच्या वर्ष गायकवाड यांनी पराभव केला. वास्तविक राजकीय पक्षाचा शिक्का लागला असताना आणि भाजप नेते म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांना संबोधले जात असताना त्यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्ती बाबत आश्चर्य आणि टीका ही व्यक्त होते आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ऍड. उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. राज्यातील महत्वपूर्ण लढतींपैकी ही एक लक्षणीय लढत ठरली. राज्यात भाजपाला मोठा धक्का बसून महाविकास आघडीला चांगले यश प्राप्त झाले आहे. आता भाजपाने पराभवाची करणे शोधताना बैठकांचा धडाका लावला आहे. ऍड.उज्ज्वल निकम यांचा पराभव होऊन पंधरा दिवसही झाले नाही तोच त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती आश्चर्यकारक समजली जाते आहे. यावर भाजप विरोधकांनी आक्षेप घेत सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी मागणी ही होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top