राजकीय
संभाजीराजे का झाले अजित पवारांवर आक्रमक
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने राज्यभरात रान पेटवल्यानंतर आज स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच…
‘ठाकरे-आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडणार नाही’; रामदास आठवलेंचा टोला
भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याने उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी ही काही फरक पडणार नाही. ठाकरे, आंबेडकर एकत्र आले तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद होतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि…
“…तर कसबा पोटनिवडणूक लढवणार”; NCP च्या रुपाली पाटील-ठोंबरेंचं विधान! म्हणाल्या,
पुणे :येथे कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी या जागेवरुन पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांच्यासाठीच २०१९ साली अगदी ऐनवेळी आपलं तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कापलं होतं असंही…
इतके बदलले आमचे फडणवीस ?” संजय राऊतांचा जबरदस्त टोला; बोलले, “ देवेंद्रजी आपला पूर्वेतिहास…!,
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जोरदार खडाजंगी बगायला मिळत आहे. आज राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण जबरदस्त पणे तापले आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “विरोधकांचे बॉम्बस्फोट नसून लवंगी फटाकेही नव्हते, आमच्याजवळ ही भरपूर बॉम्ब आहेत”, असं फडणवीसांनी…
धुळे महापालिकेच्या सभेत जोरदार राडा
धुळे महानगर पालिकेच्या महासभेत अजेंड्यावरील विषयांसोबतचं इतर विषयांवर चर्चा सुरु होती.. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित केंद्र सरकार ने ‘हर घर झेंडा’ हे अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.. त्या अनुषंगाने धुळे महानगरातील नागरिकांना घरांवर लावण्यासाठी तिरंगा उपलब्ध करून द्यावा या साठी सर्व नगर सेवकांनी एका महिन्याचे मानधन देऊन त्यातून तिरंगा उपलब्ध करावा अशी सूचना भाजपा नगर…
माजी आमदार प्रा. शरद पाटील पुन्हा शिवसेनेत
धुळे ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रा पाटील हे सध्या काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पूर्वा श्रमीचे काँग्रेसी असलेल्या प्रा पक्तही यांनी त्या वेळी बंड करून काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले. मंत्री रोहिदास पाटील यांच्या विरोधात टोकाचे राजकारण केले. पहिल्या पराभवानंतर प्रा पाटील यांनी…
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…
मुंबईःशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. शिंदेंना भाजप, शिवसेनेचे बंडखोर आमदार, अपक्ष आमदार व छोटे पक्ष यांचा पाठिंबा आहे. ते एकटेच आज सायंकाळी ७:३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजप सत्तेत राहणार असले, तरी या…
मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांना भोंगा व पदाधिकाऱ्यांसह अटक.
मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांना भोंगा व पदाधिकाऱ्यांसह अटक करण्यात आली.राज ठाकरे यांच्या आदेशान्वये व संभाजीनगर येथील सभेत जाहिर केल्याप्रमाणे दिनांक 4 मे रोजी मशिदी समोर दुप्पट आवाजाने भोंगा लावून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख व त्यांचे सहकारी आज रोजी सकाळी…
गुणरत्ने सदावर्तेना चार दिवसांची पोलीस कोठडी
संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेले गुणरत्ने सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सातारा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुंबई पोलीसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. • त्यानंतर साताऱ्याच्या गुह्यात त्यांना वर्ग करून सातारा पोलिसांनी अटक…
