
मुंबई

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आता सहा महिन्याची मुदत
मराठा विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निर्णय मुंबई – अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25 मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी…

सरकारी वकीलही आता भाजपचेच राहणार काय ? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर नाना पटोलेंचा सवाल…
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ऍड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर लगेचच भाजपने त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला असून ‘आता सरकारी वकील ही भाजपचेच राहणार’ हेच भाजपने सिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा ही…
मुंबईच्या वरळी सी फेसवर पोत्यात आढळला तरूणीचा मृतदेह,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मीरा रोड येथील सरस्वती वैद्य आणि चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एका हत्याकांडाने मायानगरी मुंबई हादरली आहे. दक्षिण मुंबईतील वरळी समुद्रकिनारी गोणीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे हात-पाय तोडलेले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचे वय 18 ते 30 दरम्यान असल्याचे कळते….

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आज मुंबई मेट्रो लाइन 2A आणि 7 चा आढावा घेणार…
मुंबई : पुढच्या आठवड्यात मुंबई मेट्रो लाइन 2A आणि 7 अधिकृत उद्घाटनापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी लिंकवरून जाणाऱ्या नवीन मुंबई मेट्रो लाईन्स – 2A (DN नगर अंधेरी ते दहिसर) आणि 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) चा आढावा घेतील. रस्ता आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग – अंधेरी पूर्व येथील गुंदवली…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची छापेमारी
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने आज सकाळी छापे टाकले. त्यामुळे कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. नंतर आता यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरांवर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरांवर ईडीची छापेमारी सुरू आहे. माझ्या…

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाने साधला एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
मुंबई : भाजपचा कथित कट उधळून लावा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या आणि रोजीरोटी वाचवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केली..2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने आपली गणिते सुरू करून दिलेली आहेत. म्हणूनच गेल्या 60 वर्षात मराठी माणसाच्या रक्त आणि घामाने निर्माण केलेली महाराष्ट्राची संपत्ती हिरावून घेण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई : धावत्या लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू
पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून शुक्रवारी मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मनोज भोसले (५७) असे मृत पोलिसाचे नाव आहे.कळवा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. तात्काळ…
- 1
- 2