दोंडाईचा शहरातील पांडुरंग बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पूजा खडसे यांच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा अभूतपूर्त सहभाग पहायला मिळाला. महिलांना दैनंदिन जीवनात स्वतः साठी वेळ मिळावा त्याचप्रमाणे त्यांना स्वतःसाठी आनंद मिळावा या उद्देशाने नगरसेविका पूजा खडसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी मान्यवरांनी पूजा खडसे यांचे कौतुक देखील केलं.
महाराष्ट्र चे प्रसिद्ध व्यक्तिमत्व पंकज यादव यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर च्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले यात महिलांनी चांगलाच सहभाग नोंदवला.महिला दिनाच्या निमित्ताने पूजा खडसे यांच्या या उपक्रमाचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमात दोंडाईचा शहरातील असंख्य महिलांची उपस्थिती दर्शवली. या वेळी मान्यवरांनी पूजा खडसे यांचे कौतुक देखील केलं.या कार्यक्रमालापणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालक मंत्री जयकुमार रावल , दोंडाईचा नगरपरिषद नगराध्यक्षा नयनकुवर रावलविकास रत्न उद्योगपती सरकार साहेब रावल, भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष धरती देवरे , बाजार समिती अध्यक्ष नारायण भाऊसाहेब , दोंडाईचा नगरपरिषद गट नेते निखिल जाधव ,नगरपरिषद उपनगराध्यक्ष विजय पाटील, संजीवनी शिसोदे देखील उपस्थित होत्या.
( प्रतिनिधी : समाधान ठाकरे )

