निजामपूर – शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजातील शेवटच्या माणसाला मिळावी त्या योजनांचा लाभ घेता यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शेतजमिनी सह शेत शिवारातील वहिवाटीच्या रस्त्यांचे वादग्रस्त महसुली प्रश्नांचे तातडीने निराकरण व्हावे या उद्देशाने राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे राज्यभरात आयोजन करण्यात आले; असून या योजनांचा लाभासह आता शेतकऱ्यांना ऑनलाइन डिजिटल सातबारा प्राप्त करण्याची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. असे साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना साम्य विचारातून शेत शिवारातील वहिवाट रस्त्यांचे प्रश्न बांधावर बसून मिटवले तर शासनाच्या महसूल विभागाला सहकार्य होण्यास मदत होईल असे नमूद करीत तहसीलदार साहेबराव सोनवणे म्हणाले की, या समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेला रयतेचे राज्य ही संकल्पना आपल्या सकारात्मक विचारातून प्रत्यक्षात अनुभवास यावी या विचाराने समाधान शिबिर घेतले जात असल्याचे सांगितले.या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळा पूजनासह मल्यार्पण करून धुळे ग्रामीणचे प्रांताधिकारी रोहन कुवर, तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले. याप्रसंगी निजामपूर सरपंच शितल शाह जैताणे सरपंच कविता मुजगे, नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी, निजामपूर माजी सरपंच अजितचंद्र शाह, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल, मा.पं.स.सदस्य अशोक मुजगे, उपसरपंच बाजीराव पगारे,वाणी समाज अध्यक्ष भालचंद्र कोठावदे,ईश्वर ठाकरे,वासखेडि उपसरपंच दिपक जाधव,अनिल महाजन,भामेर सरपंच मनोज सोनवणे, वाघापूर उपसरपंचअर्जुन बोरकर, युवराज चव्हाण,परिसरातील आजी-माजी सरपंच सदस्य,पत्रकार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश शाह यांनी केले. प्रास्ताविक निजामपूर मंडळ अधिकारी मनीषा अहिरे यांनी केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाची सविस्तर माहिती दिली. प्रांताधिकारी रोहन कुवर म्हणाले, या समाधान शिबिरातून समाजाने तसेच शेतकऱ्यांनी विविध योजना माहिती समजून घ्यावी शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण जनते सह शेतकऱ्यांना महसूल विभागाच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी विविध उपाययोजना गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान समर्थपणे राबवले जात आहे. तहसीलदार साहेबराव सोनवणे म्हणाले की, या अभियान उपक्रमातून त्यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्त करणे, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा व आठ अ उतारे उपलब्ध करून देणे. उत्पन्न दाखला रहिवासी दाखला तसेच जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देणे या कामांचा समावेश असून ते मार्गी लावले जातील.पीएम किसान नोंदणी,आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड संबंधित कामे,संजय निराधार योजना,इंदिरा गांधी,संजय गांधी योजना ई. केवायसी सह इतर कामे या शिबिरातून केली जाणार आहेत. समाधान शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळ अधिकारी मनीषा अहिरे निजामपूर,मंडळ अधिकारी अनिल बाविस्कर जैताने,मंडळ अधिकारी गजानन सोनवणे शेवाळी,तलाठी आनंदा सूर्यवंशी निजामपूर, तलाठी अश्विनी भामरे जैताणे, तलाठी राजेंद्र बागुल शिवाजीनगर, तलाठी ज्ञानेश्वर सोमवंशी भामेर,तलाठी जितेंद्र बागुल खुडाणे,तलाठी राहुल आभुज,तलाठी पुजा चव्हाण घाणेगाव,तलाठी रूषीकेश गोलरकर दुसाणे,ग्रामविकास अधिकारी राहुल मोरे निजामपूर, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड जैताने,वैदयकिय अधिकारी डा.क्रांती वळवी,डा.प्रिंयका लाड,महसुल कर्मचारी,निजामपूर ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल आदींनी परिश्रम घेतले.या शिबिराला शिक्षण, महसूल,आरोग्य ई-सेवा केंद्र ग्रामपंचायत सदस्य,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, तसेच ग्रामस्थ महिलांची उपस्थिती होती आभार प्रदर्शन निजामपूरचे मंडळ अधिकारी अनिल बाविस्कर यांनी केले.
( प्रतिनिधी : हेमंत महाले )

