ज्या आईने तिला दत्तक घेऊन वाढवलं… प्रेम दिलं, शिक्षण दिलं, आयुष्य घडवलं… त्याच आईचा जीव घेण्याचा निर्णय तिने घेतला. ओडिशामधील एका धक्कादायक घटनेत, एका अल्पवयीन मुलीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने स्वतःच्या पालक आई राजलक्ष्मी कर यांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
ओडिशामधील परलाखेमुंडी शहरातली हि धक्कादायक घटना आहे, एका अल्पवयीन मुलीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने स्वतःच्या पालक आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव राजलक्ष्मी कर असून तिने या आरोपी मुलीला अवघ्या तीन वर्षांची असताना दत्तक घेतले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या संपत्ती मिळविण्यासाठी आणि राजलक्ष्मी यांच्या काही निर्णयांवर विरोध असल्यामुळे घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आरोपी अल्पवयीन असून तिच्या दोन मित्रांनीही या गुन्ह्यात सक्रिय सहभाग घेतला.
राजलक्ष्मी कर या समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी मुलीचे संगोपन आपल्याच लेकरासारखे केले होते. मात्र, त्यांच्या विश्वासाचा असा अंत होईल, हे कुणाच्याच कल्पनेपलीकडचे होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
