धुळ्यात अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

सुनील नेरकर यांनी दिली माहिती : धुळ्याला पहिल्यांदाच मिळाला मान, २० जुलै २०२५ रोजी बैठक

धुळे : अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या रविवार दि. 20 जुलै रोजी शहरातील हॉटेल गोल्डन लिफ येथे होणार आहे. पहिल्यादाच या बैठकीचा मान धुळ्याला मिळाला असून त्यात नवीन पदाधिकारी नियुक्तीसह विविध विषयांवर विचारमंथन देखील होणार आहे. या बैठकीला 11 राज्यातील राष्ट्रीय अध्यक्ष, पाचशेवर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल नेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धुळे शहरात आजही मोठा उद्योग व व्यवसाय नाही, त्यामुळे तरूणांना मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे ना. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून धुळ्यात मोठा उद्योग, आयटीपार्क मंजुर होण्यासाठी आपला प्रयत्न राहील. शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने पक्ष, राजकारण बाजुला ठेवून एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली. यावेळी सुनिल नेरकर यांच्यासह संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे, प्रदेश कार्यवाह अजय कासोदेकर, प्रदेश समन्वयक विवेक वाणी, विविध आघाडीचे अध्यक्ष रविंद्र मालपूरे, भुषण सोंजे, प्रशांत ब्राम्हणकर, धुळे शहराध्यक्ष पवन खानकरी, दिलीप पाखले आदी उपस्थित होते. यावेळी सुनिल नेरकर यांनी वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. देशभरात वाणी समाजात एकुण 26 पोट जातीअसून त्यापैकी 5 पोटजाती एकत्र आणण्यास आम्हाला यश आले आहे. आणखी बर्‍याच पोटजाती एकत्र आणावयाच्या आहेत. याबरोबरच वाणी समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी शासनस्तरावर सतत पाठपुरावा केला गेला. अनेक आंदोलन केली. अखेर त्यास देखील यश मिळालेले आहे. उद्या रविवारी समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक धुळ्यात होत आहे. सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार्‍या या बैठकीत पहिल्याा सत्रात नविन पदाधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर दुसर्‍या सत्रात विविध राज्यातील अध्यक्ष व पदाधिकारी निवडले जातील. याबरोबरच समाजातील तरूणांना रोजगार, वैवाहिक समस्या, महिलांना गृह, लघुउद्योगासाठी मदत करणे, शैक्षणिक संस्था सुरू करणे, समाजातील उत्कृष्ठ काम करणार्‍यांचा सन्मान करणे, समाज संघटनासाठी प्रयत्न, या विषयांवर पुढे प्रामुख्याने काम केले जाणार असून या बैठकीत त्यावर देखील विचार मंथन केले जाणार असल्याचे सुनिल नेरकर यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच समाजातील मुलींचे योग्य वयात लग्न झाले पाहिले. शेतकरी, व्यावसायीकांचा देखील पालकांनी विचार करणे आवश्यक आहे, याबाबत संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. कारण शेतकरी पिकविणार नाही तर आले पोट भरणार नाही, त्यामुळे शेतकरी देखील महत्वाचा आहे. भविष्यात एआयमुळे अनेकांच्या नोकर्‍या धोक्यात येवू शकतात. त्यामुळे मुलींनी केवळ नोकरीधारकाचा विचार न करता शेतकरी, व्यावसायीकाचा देखील विचार करावा, याबाबत देखील प्रबोधन केले जाणार आहे. यासाठी समाजातील लग्नरचना आणि व्यवस्था देखील बदलणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धुळ्यात मोठा उद्योग आणण्यासाठी मी स्वतः ना. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असून भविष्यात जर आयटीपार्क मंजुर झाले तर येथील तरूणांना बाहेर जाण्याची गरज राहणार नाही. तसेच जे गेले आहेत ते पुन्हा धुळ्यात येवून नोकरी करून शेती, उद्योग देखील सांभाळु शकतील. त्यामुळे यासाठी देखील माझा प्रयत्न राहणार असल्याचेही सुनिल नेरकर यांनी सांगितले.
इच्छुकांना संधी मिळवून देवू-
राज्यासह धुळे जिल्ह्यात वाणी समाजाची बहुसंख्येने असून त्यांची सामाजिक, राजकीय क्षेत्रातील भुमिका निर्णायक अशी आहे. वाणी समाज राजकीय वर्तुळात असला तरी समाजाला नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झालेली नाही. भविष्यात निर्णायक शक्तीच्या बळावर नेतृत्व करण्यासाठी समाजातील जी मंडळी नेतृत्व करण्यास इच्छुक असतील, त्यांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. जो पक्ष समाजाला न्याय देईल, समाजाची निर्णायक शक्ती लावली जाईल, असेही सुनिल नेरकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top