धुळे पोलिस दळणवळण विभागाला राज्यात दुसरा क्रमांक; तांत्रिक कार्यक्षमतेची दखल

धुळे : पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात धुळे विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत पश्चिम विभाग, पुणेमधील २८ युनिट्सपैकी दुसरा क्रमांक मिळवला आहे.

हे मूल्यांकन अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विभागातील तांत्रिक कार्यक्षमता, नविन तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि प्रशासकीय सुसूत्रता या निकषांवर धुळे विभागाची निवड झाली.

केलेल्या महत्वाच्या तांत्रिक कामांची झलक:

  1. निवडणूक बंदोबस्तासाठी तांत्रिक साहित्य खरेदी: RF Coaxial Cables, DFMD, HHMD, 12V चार्जर्स यांसारख्या अत्याधुनिक साधनांची खरेदी करण्यात आली.
  2. शॅडो बुथचे तांत्रिक पुनर्रचना: धुळे जिल्ह्यातील ९१ शॅडो बुथ कमी करून ६६ वर आणले गेले. पळासनेर, पुडाशी व जुनावणे येथे तात्पुरते रिपीटर उभारून दळणवळण मजबूत करण्यात आले.
  3. वॉकी-टॉकी नेटवर्क विस्तार – धुळे शहर: इंडस टॉवर, मोहाडी येथे 90 मीटर टॉवर व वातानुकूलित यंत्रणा बसवून संपूर्ण शहरात बिनतारी दळणवळण सुरळीत करण्यात आले.
  4. साक्री शहरात दळणवळण प्रस्थापना: एटीसी टॉवरवर उभारणी करून साक्री शहरातही वॉकी-टॉकी सेवा पूर्ण क्षमतेने सुरु केली.
  5. मंथन हॉलमध्ये 8–10 तास बॅकअप: CSR फंडातून 5KVA बॅटरी बँक बसवण्यात आली.
  6. मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेतून 11 प्रशिक्षणार्थी: लोकसभा निवडणूक व कार्यालयीन कामांसाठी तांत्रिक प्रशिक्षण देत त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्यात आला.
  7. 5G interference बाबत उपाय: पोल नेट फेज 2 यंत्रणा पुन्हा सुरु करण्यासाठी 5G फिल्टर बसवले गेले.
  8. भांडार कक्षाचे नूतनीकरण: जुनी व गळकी भांडार रूम नव्या जागेत हलवून, इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली.
  9. संचांची प्रोग्रामिंग व सुसूत्रता: फ्रिक्वेन्सी प्लॅनिंग, ID प्रोग्रामिंग, वॉटेज इ. कार्यक्रमांमुळे बिनतारी दळणवळण अधिक कार्यक्षम केले.

या यशाचे श्रेय पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक पथकाला जात असून, त्यांनी विविध संस्थांच्या सहकार्याने उपलब्ध जागा, CSR फंड, तांत्रिक साहित्य व मनुष्यबळ यांचा समन्वय साधत धुळे जिल्ह्यात प्रभावी दळणवळण व्यवस्था उभारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top