ळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः साक्री, शिरपूर आणि धुळे तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी केली आहे.
ईश्वर पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा आता तरी पूर्ण करावी. तसेच धुळे जिल्हा ‘ओला दुष्काळग्रस्त’ घोषित करून अतिवृष्टी व वादळामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या पातळीवर कापूस व मका खरेदी केंद्र तातडीने सुरु करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकेल.
तसेच शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने तलाठी यांच्याकडे करण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत, अशीही मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

