धुळे येथे गृहरक्षक दलाचा २९ वा वर्धापन दिन साजरा.

गृहरक्षक दलातर्फे जिल्हा रुग्णालयात करण्यात आले फळ वाटप

धुळे जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचा २९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त या सप्ताहात वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज १६ डिसेंबर रोजी  धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.    

    गृहरक्षक दलाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त या सप्ताहात श्रमदान , वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी धुळे जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या मंगला पाटील, समादेशक दिनेश मराठे यांच्यासह पदाधिकारी व होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top