पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली माहिती

धुळे येथील संत बाबा धीरजसिंह खालसा यांच्या खळबळजनक हत्या प्रकरणाचा तपास अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मोहाडी परिसरातील गुरुद्वारात बाबांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विविध संघटना आणि नागरिकांकडून तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, आता हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून काढून सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास आता सीआयडीमार्फत केला जाणार असून, हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आणि नेमक्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे.
( प्रतिनिधी : कार्तिक सोनवणे )

