अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फिर्याद दाखल

महानगरपालिका निवडणूक आचार संहिता कालावधी तसेच नाताळ व 31 डिसेंबर 2025 च्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाची बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर घडक कारवाई करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला अज्ञात हल्ले खोरान विरुद्ध मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
निरीक्षक, आर.आर. धनवटे राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार नवीन मनमाड इंदोर रेल्वे क्रोसिंग च्या बाजूला अन्वर नाला जवळ पिंप्री शिवार पत्री शेड मध्ये ता.जि.धुळे या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी पत्र्याच्या शेड मध्ये बनावट देशी महा, बनावट मद्य निर्मिती करण्याचे साहित्य मिळून आले. छापा दरम्यान कारवाई करीत असतांना स्थानिक अज्ञात इसमांनी राज्य उत्पादन शुल्क, धुळे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला करून जखमी केले व महिंद्रा कंपनीची चारचाकी पिकअप वाहन तिचा परिवहन क्रमांक MH-41-AU-6207 मध्ये अंदाजित 200 लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे एकूण 2 प्लास्टिक ड्रम मध्ये स्पिरीटने भरलेले ड्रम तसेच 90 मिली क्षमतेच्या रिकाम्या बाटल्यांचे बॉक्स व इतर साहित्य घेवून गाडी मालक हा वाहन घेवून घटनास्थळावरून पळून गेला असल्याने त्याबाबत मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे त्याच्यावर रीतसर गुन्हा नोंद केलेला आहे. कारवाई दरम्यान जखमी झालेले निरीक्षक आर. आर. धनवटे, दुय्यम निरीक्षक अमोद भडागे, जवान दारासिंग पावरा, सुरेश शिरसाळे यांच्यावर जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचार करण्यात आला. घटनास्थळावरून एकूण किंमत रु.5,71,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात इसमा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ब, क, ड, ई, फ) 80,81,83,90,108 अंतर्गत गुन्हा र.क्र.435/2025 दिनांक 19/12/2025 रोजी नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई निरीक्षक श्री. आर. आर. धनवटे, धुळे विभाग, दुय्यम निरीक्षक श्रीमती. शुभांगी मोरे, दुय्यम निरीक्षक श्री. अमोद भडागे, दुय्यम निरीक्षक श्री. दिपक गवळी, सोबत सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे.बी.फुलपगारे, श्री. अनिल निकुंबे, जवान दारासिंग पावरा, नितीन पाटील, सुरेश शिरसाळे, गौरव सपके, मनोज धुळेकर, मयूर मोरे, बाळकृष्ण सोनवणे, कल्पेश शेलार व जावन-नि-वाहनचालक श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या पथकाने सदरची कारवाई केली असून श्रीमती स्वाती काकडे मॅडम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, आर. आर. घनवटे राज्य उत्पादन शुल्क, धुळे हे पुढील तपास करीत आहेत.
( प्रतिनिधी : कार्तिक सोनवणे )

