तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

साक्री उप विभागातील पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकरी यांच्या शेतातून कापूस, सोयाबीन व बाजरी चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक , व अपर पोलीस अधीक्षक , यांनी पोलीस निरीक्षक, साक्री पोलोस स्टेशन व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिल्याने, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक, साक्रो पोलीस स्टेशन यांनी संयुक्तीक पथक स्थापन केले. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक , उप विभागीय पोलीस अधिकारी, साक्री उपविभाग, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक साक्री पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी शेतीमाल चोरी करणारे आरोपीतांची गोपनिय व तांत्रिक माहिती काढली.
साक्री पोलीस स्टेशन गुरनं २६८/२०२५ भा.न्या.सं.क. २०२३ चे कलम ३३१(२), ३३१ (४), ३०५ (४) प्रमाणे गुन्हयातील एक आरोपी सिन्नर येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सिन्नर जि. नाशिक येथे जावून सोन्या उर्फ सोनु निंवा भिल रा. किरवाडे ता. साक्री जि.धुळे यास वेलू ता. सिन्नर जि. नाशिक येथे शिताफितीने पकडले व त्यास गुन्हयातील चोरी बाचत विचारणा केली असता सोनू भिल याने चोरी केल्याचे सांगून त्याचे सोबत विनोद गुलाब अहिरे रा. मुल्हेर ता. सटाणा जि. नाशिक ह.मु. कुडाशी ता. साक्री जि.धुळे सागर अनिल मालचे रा. घाडणे ता. साक्री जि. धुळे लक्ष्मण माणिक मालचे रा. धाडणे ता. साक्री जि. धुळे राज संभाजी मालचे रा. धाडणे ता.साक्री जि. धुळे असे साथीदार असल्याचे सांगितले. पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी उर्वरीत आरोपी यांचा शोध घेवून त्यांना पिंपळनेर ता. साक्री येथील चौफुलीवरुन ताब्यात घेतले. आरोपीतांना विचारपुस केली असता आरोपीनी स्वतःच्या फायदयासाठी संगनमत करुन पिकअप या वाहनाचा वापर करुन साक्री तालुक्यातील मालपुर, विजापुर, नांदवण, कावदे, बल्हाणे, विरखेल व धनेर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापुस, बाजरी असा मुद्देमाल चोरी करुन खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबूल केले. हस्त केलेला मुद्देमाल खालील प्रमाणे : १७५,०००/- किमतीचा २५ क्विटंल वजनाचा कापूस १,५०,०००/- किंमतीचा ३० क्विटंल वजनाचा सोयाबीन १०५००/- किंमतीची ३ क्विटंल वजनाची बाजरी ५,००,०००/- किमतीची पिकअप वाहन क्रमांक MHY/AU ३२७७ एकूण ९,८५,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार निरीक्षक दिपक बळवी यांच्या मार्गदशनाखाली पथकाने कामगिरी केली.साक्री पोलीस स्टेशन पथकात सपोनि अनिल बागुल, सपोनि विकास शेवाळे, पोसई प्रसाद रॉवळ, पोराई महेश घायतड असई बापु रायते, पोह उमेश चव्हाण, पोकों नारायण चव्हाण, पोकी मयुर चौधरी, पोकों तुषार जाधव, पोको सुशिल सुर्यवंशी, पोकों साईनाथ पवार यांच्या सह,स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांच्या पथकात सपोनि नामदेव सहारे, पोसई संजय पाटोल,पोह सदेसिंग चव्हाण, पोह संतोष हिरे, पोह तुषार सूर्यवंशी , पोह पंकज खैरमोडे, कैलास महाजन पार्का अतुल निकम, पोकों महेंद्र सपकाळ.
( प्रतिनिधी : कार्तिक सोनवणे )

