महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने  मारली बाजी

धुळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ  कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

राज्यात पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत 5 नगराध्यक्ष आणि 55 हून अधिक नगरसेवक निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाचे पडसाद धुळ्यातही उमटले असून, या विजयामुळे  धुळे शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. पक्षाला मिळालेल्या  यशामुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, गणेश जगदेव, योगेश पगारे, ॲड. रविकांत वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top