धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा व धुळे पथकाची संयुक्त कारवाई

महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक धुळे यांच्या सुचनेनुसार विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार दिनांक 11/01/2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे धुळे शहरातील देवपूर भागातील वडेलरोड येथे स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पथकाने नाकाबंदी करुन, विद्याधन कॉलेजसमोर वडेल गावाकडुन धुळे शहराकडे मारोती सुझुकी चारचाकी वाहन क्रमांक-GJ/01-HN-5387 येत असल्याचे समजले. सदर वाहनास थांबवुन चालक स्वप्निल दिनेश मोरे, वय-32 वर्ष, रा. महादेवपुरा, दोंडाईचा याचेकडे वाहनातील माल बाबत विचारपुस केली असता त्याने संशयास्पद उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची तपासणी केली असता,  2,00,640 किमतीचे विदेशी दारू 19बाटली, 8.27.520 रु.कि.ची देशी विदेशी दारु व चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशाप्रकारे धुळे महानगरपालिका निवडणुक पार्श्वभुमीवर विशेष मोहिम अंतर्गत विना परवाना देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक करतांना आरोपी स्वप्निल दिनेश मोरे, वय-32 वर्ष, रा. महादेवपुरा, दोंडाईचा याचे तावे कब्जातील मारोती सुझुकी चारचाकी वाहन क्रमांक-GJ/01-HN-5387 मधुन एकुण 2,27,520/- रु. किंमतीची देशी विदेशी दारु आणि 6 लाख रु.किंची चारचाकी हस्तगत करुन, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्रोव्हीविशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कामगिरी श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे सपोनि. श्रीकृष्ण पारधी, पोउनि. संजय पाटील व पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, तुषार सुर्यवंशी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ व अतुल निकम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top