बॅनर फाडणाऱ्यां विरोधात कारवाई करण्याची मागणी…
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. यानिमित्ताने शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारांचे नाव आणि त्यांचे चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी उमेदवारांकडून प्रत्येक भागात बॅनर लावण्यात येत आहेत मात्र शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर अज्ञातांनी फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे. यामुळे उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बॅनर फाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

