हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या शताब्दी वर्षा निमित्त शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. धुळे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची तब्बल वीस फूट उंचीची प्रतिमा उभारण्यात आली होती. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची भव्य दिव्य प्रतिमा धुळेकरांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती.
दरवर्षी 23 जानेवारीला साजरी होणारी त्यांची जयंती ही लाखो शिवसैनिकांसाठी आणि विचारांवर प्रेम करणाऱ्यांसाठी केवळ स्मरणदिन नसून प्रेरणेचा उत्सव असतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष यंदा साजरे होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील भगवा चौक येथे तब्बल वीस फूट उंचीची प्रतिमा उभारून त्यांना अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी उपस्थित डॉ.अरुण साळुंखे, किशोर बोरसे, प्रवीण मुर्तडकर, मॅनेजर सुबोध कुमार, सौ.अस्मिता शिंदे, प्रशांत बडगुजर, सुनीता माळी, सीमा खैरनार, अभिषेक खैरनार, आरती अहिरे, विनोद रनमळे, बाली पुरोहित, आप्पा भडागे, राजेंद्र ठक्कर, मंगेश पिंगळे, जितेंद्र पाटील, आबा वाणी, स्वप्नील सोनवणे, सागर साळवे, गोकुळ येलमामे, निलेश चौधरी, पवन खांडरे, जयवंत गोरे, दर्शन खंबायत, विक्की गर्ग, हर्षल ढोले, यश ढमडेरे, कुणाल मराठे, ज्ञानेश्वर देवरे, सिद्धार्थ गोरे, पंकज बागुल, सोनू मुर्तडक, मयूर कुळकर्णी, बाळू पाटील, इम्रान शेख, अमोल गोरे, यांच्या सह भगवाचौक सदस्य उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव ऍड पंकज गोरे यांच्यावतीने या अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

