15 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत चालणार तपासणी मोहीम
अरुणोदय सिकलसेल मोहिमे अंतर्गत साक्री येथील अंबापुर रोड येथे शून्य ते 40 वर्ष गटातील लाभार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर समुपदेशन करण्यात आले हि तपासणी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत चालू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉक्टर तनुश्री ठाकूर आरोग्य सेवक हर्षल सूर्यवंशी युवराज ठाकरे , नीलिमा शेलार, आशा वर्कर शोभा पाटील व नागरी आरोग्यवर्धनि केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
( प्रतिनिधी: निलेश सावळे )

