साक्रीतील आमोडे गावात महाशिवरात्री उत्साहात साजरी

मंगलमय वातावरणात गावातून निघाली शोभायात्रा,

साक्री तालुक्यातील अध्यात्मिक असलेले आमोडे गाव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे.  या गांवात महादेवाची शिवलिंग व आदिशक्ती दुर्गा मातेच व कंसरा मातेचे मंदिर स्थापना करण्यात आली आहे,  या वर्षी ही सालाबाद प्रमाणे आमोडे (आनंदपूर ) गांवात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी -श्री -श्री -श्री, 1008 महामडलेश्वर आदिशक्ती सतिगिरीजी महाराज यांची रथ-शोभा यात्रा काडून भव्य दिव्य अशी मिरवणूक संपूर्ण गावात काढण्यात आली‌. गावातील नागरिकांनी व सर्व भक्तांनी वाद्याचा तालावर आनंदाचे नाचत -गायत मिरवणूक सहभाग नोंदवला. महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती सतिगिरीजी महाराज यांनी भाविकांना सत्संग प्रवचन च्या माध्यमातून  महाशिवरात्री चे महत्व सांगितले, त्या नंतर रात्री भाविकांनी महा प्रसादाचा लाभ घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top