धुळ्यात अभाविप चे रस्ते दुरुस्ती संदर्भात उपायुक्तांना निवेदन

अभाविपच्या धुळे शाखेतर्फे SSVPS अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता तात्काळ बनवणे व जुना मुंबई – आग्रा रोड रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे या संदर्भात धुळे महानगर पालिकेच्या उपायुक्त स्वालिहा मालगावे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या कित्येक महिन्यांपासून SSVPS अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता खराब असल्याने विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी अडचणी येत आहेत. या रस्त्यात 2 महाविद्यालये व 1 शाळा येतात. बऱ्याचदा सांगूनही प्रशासनाने रस्ता न केल्यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थी प्राध्यापक व पालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. तसेच जुना मुंबई – आग्रा रोड येथील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे येणाऱ्या वाहतूक समस्या दूर करण्यासाठी अतिक्रमण हटवण्यात यावे व रस्ता ही लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शहरमंत्री मयुरी जाधव, सहमंत्री हर्षल शिरसाठ, मनिष कुलकर्णी, केदार जोशी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top