राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराने जन्मदात्या वडिलांना काढले घराबाहेर, गुन्हा दाखल !

बीड : बीडच्या राजकारणातील (Beed Politics) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी या प्रकरणी…

Read More

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ‘ती’ चूक करू नका, पोलिसांनी स्पष्टच सांगितलं होईल मोठी कारवाई, इशारा काय?

महाराष्ट्र राज्य हे महापुरुषांचं आणि साधुसंतांचं असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या जल्लोषात साजरा केला जातात. विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. डीजे डॉल्बीच्या तालावर तरुणाईचा जल्लोषही बघायला मिळत असतो. अनेक ठिकाणी व्याख्यान आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमही केले जातात. हेच कार्यक्रम करत असताना वर्गणी गोळा केली जाते. त्यासाठी पावती पुस्तक छापून अनेक जण सक्तीने…

Read More

Maharashtra Assembly Session : भूखंड खा कुणी श्रीखंड खा!, गद्दार बोलो सत्तार बोलो’ म्हणत विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक

महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जमीन घोटाळा आरोप प्रकरणावरून आज विधानसभेत विरोधक विरूद्ध सत्ताधारी असा सामना पाहण्यास मिळाला. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड अल्प दरात दिल्याचे आरोप झाले. त्यावरून राडा झाला तर २५ डिसेंबरला म्हणजेच रविवारी अब्दुल सत्तारांचं प्रकरण समोर आलं. यावरून विरोधक विरूद्ध सत्ताधारी असा जोरदार सामना पाहण्यास मिळाला. विधानसभेत जोरदार घोषणाबाजीविधानसभेत…

Read More

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याशी सहमत नाही

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विकास कामांच्या शुभारंभ निमित्त आज 30 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात मराठी उद्योजकांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. पत्रकारांनी त्यांना राज्यपालांच्या वक्तव्या संदर्भात छेडले असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही कारण मराठी उद्योजकानी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले असून…

Read More

पांझरा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी

अक्कलपाडा प्रकल्पातून विसर्ग धुळे प्रतिनिधी: धुळे आणि साक्री तालुक्यांच्या सीमा रेषेवर असलेल्या अक्कलपाडा निम्मं पांझरा प्रकल्पाच्या क्षेत्रात 2, 3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रकल्पात पाणी पातळी वाढली आहे. या प्रकल्पातून पांझरा नदी पत्रात 2 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होतो आहे. पुढील 72 तासात अजून पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे नदीच्या…

Read More

सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक मार्गात बदल

नंदुरबार नवापूर तालुक्यात सरपणी नदीला पुर आल्याने सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी येथील पुलावरुन पाणी वाहत आहेत. त्यामुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून येणारी सर्व वाहने उच्छल-दहिवेल-नंदुरबार मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच डोकारे कारखान्याजवळ जिल्हा रस्ता मार्ग बंद करण्यात आला आहेत. असे जिल्हाप्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Read More
Back To Top