महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी 43 उमेदवारांचे 55 अर्ज दाखल
धुळे, दिनांक 28 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघासाठी 43 उमेदवारांनी 55 नामनिर्देशन पत्र दाखल केले असून 39 व्यक्तींनी 60 नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत…
धुळे जिल्हा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गावठी कट्टे, तलवारी, गुटका, दारू याबाबत गुन्हे दाखल
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात कोणताही अनुवहित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. नाहनांची तपासणी, चेक पोस्ट तपासणी, यासोबतच गावठी कट्टे, दारू, गुटका आणि हिस्ट्री सीटर गुन्हेगारांना पकडणे सुरु केले आहे.दिनांक १५ ऑक्टोबर पासून अर्थात आचारसंहिता लागू झाल्या पासून धुळे जिल्यात खालील प्रमाणे…
धुळे हद्दीत गुजरातहुन येणाऱ्या ३० ट्रॅव्हल्सची पोलिसांनी पहाटे केली अचानक तपासणी
धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिस प्रशासन चांगलेच ऍक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा अवैध वस्तूंची तसेच पैशांची वाहतूक अवैध मार्गाने होऊ नये यासाठी जिल्हाभरात यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पोलिसांनी धुळे – सुरत मार्गावर आपला ताफा वळविला. गुजरातहून धुळ्याकडे येणाऱ्या तब्बल…
पुणे शहरात नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं जप्त…
पुणे शहरात जागोजागी पोलिसांची नाकाबंदी नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं जप्त…
पावसाने झोडपले, सरकारने सावरावे,देऊर परिसरातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन
धुळे जिल्यातील देऊर खु. , देऊर बु., नांद्रे परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही २०२४ खरीप हंगामातील कापूस,कांदा,मका या पिकांसाठी मुदतीत प्रधानमंत्री पीकविमा योजनेला अर्ज भरला आहे. मात्र, मागील १५ दिवसात परतीच्या पावसाने आमच्या पिकांचे अतोनात नुकसान केले.. कपाशीची बोन्डे काळी पडलीत, कपाशी…
बालरंगभूमी परिषद आयोजित दिव्यांग मुलांचा “यहा के हम सिकंदर” महोत्सव धुळ्यात संपन्न
बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखा नियोजित यहा के हम सिकंदर हा दिव्यांग मुलांचा विविध कलागुणांचा महोत्सव दि २२ ऑक्टोबर रोजी शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिरात जल्लोषात संपन्न झाला या महोत्सवात जिल्ह्यातील 17 दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री देखील यावेळी…
धुळे कोर्टातील नवीन इमारतीत बसायला जागा नाही म्हणून वकीलसंघातर्फे निषेध करून एक दिवसाचा बंद पाळण्याचा निर्णय
उद्याच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार करत वकिलांचा धुळ्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगमध्ये वकिलांना बसायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने होणाऱ्या धुळे जिल्हा न्यायालय नुतन इमारतीच्या बांधकामाच्या उदघाटन कार्यक्रमावर उद्या दि.२३ रोजी वकिलांनी लालफित लावून प्रशासनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. धुळे बार असोसिएशनचा कोणताही सभासद या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही. कार्यक्रमस्थळी वकील सदस्य…
तावखेडा परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत
बिबट्याने वासरू केले फस्त नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा परिसरात बिबट्याने थैमान घातलेय. शेतात बांधलेल्या एका वासराला बिबट्याने फस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तावखेड्यात राहणारे दिलीप खंडेश्वर कुलकर्णी यांनी आपल्या शेतात बांधलेल्या ८ गुरांपैकी एक वासरू बिबट्याच्या हल्ल्यात गमावले. २२ ऑक्टोबर मंगळवार रोजी मध्यरात्री बिबट्याने…
पाण्याची मोटर चोरी करणारे अट्टल चोरटे जेरबंद
शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटर चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६८ हजार किमतीच्या ५ मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. शेतकरी प्रियदर्शन काशिनाथ बागले यांची ब्राह्मणे शिवारातील शेतातून पाण्याची मोटार चोरीस गेल्याची तक्रार ३१ जानेवारी २०२४ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक…
दोंडाईचा पोलिसांची कामगिरी : ५ दिवसात ७ ठिकाणी कारवाया करून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
दोंडाईचा – शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाणे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या ५ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून पोलिसांनी हि कारवाई केली.दोंडाईचा शहरातील मेहेतर कॉलनी भागात सुशीला अशोक नेतले हि महिला हातभट्टीची दारूविक्री चा व्यवसाय करत होती. तसेच गोपाळपुरामधील दारूविक्री करणारा महेंद्र शिवराम पवार, निमगूळ गावातील रेखाबाई नानाभाऊ भील, कुरुकवाडे…
