रावसाहेब पाटील पिता-पुत्र हत्याकांड प्रकरण
धुळे – शहरातील देवपूर भारत राहणारे रावसाहेब पाटील आणि त्याचा मुलगा वैभव पाटील या पिता पुत्रांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी १३ पैकी ११ आरोपीना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर आरोपीना सहकार्य करण्याच्या आरोपाखाली एकाला ५ वर्षाची शिक्श देण्यात. आली या हत्याकांडातील एकाला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. आज १२ मार्च २०२६ रोजी धुळे सत्र न्यायालयातील न्या. जयश्री पुलाटे यांनी हि शिक्षा सुनावली. आज निकाल असल्याने न्यायालयाच्या आवारात प्रचंड गर्दी जमली होती.
दिनांक ८ जून २०१८ रोजी संद्याकाळी रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या पैकी घटनेच्या दिवशी वैभव उर्फ सोनू अरुण पवार हा अमळनेर ला असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने त्यास निर्दोष मुक्तता करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून बाजीराव उर्फ सुभाष साजन पवार असल्याचा आरोप करण्यात आला होता.त्याच्या सह ११ जणांना खुनाच्या गुन्हयात दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली. यात बाजीराव पवार, भूपेश वाल्मिक पाटील, दादू रवींद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, अर्जुन भगवान अहिरे, गौरव बाजीराव पवार, भूषण बाबुराव कापकर,भूषण निंबा पगारे या ११ आरोपीना दुहेरी जन्मठेप सुनावण्यात आली. तसेच संदीप उर्फ विक्की दिलीप वेळीस याने आरोपीना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्याला ५ वर्षाची शिक्षा करण्यात आली.
पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड घडले होते. यामुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरावून गेला होता. आज आरोपीना शिक्षा सुनावण्यात येणार असल्याने कोर्टाच्या आवारात मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे न्यायालयाने सकाळ ऐवजी दुपारी तीन नंतर शिक्षा सुनावली. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा होताच त्यांच्या नातेवाइकांना रडू कोसळले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
