
मी काही आक्षेपार्ह्य बोललेच नाही – खा.शोभाताई बच्छाव लोकप्रतिनिधी म्हणून फोन उचलणे क्रमप्राप्त..
मी काही आक्षेपार्ह्य बोललेच नाही – खा.शोभाताई बच्छाव यांचे स्पष्टीकरण. धुळ्याच्या खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. मालेगाव मधील एक गुरांच्या व्यापाऱ्याने थेट संपर्क साधून पोलिसांनी पकडलेली आपली गुरे सोडवून देण्याची मागणी केली आहे. यावरून सोशल मीडियावर टीकेचे लक्ष ठरलेल्या खासदार.डॉ. शोभाताई बच्छाव यांनी आपले म्हणणे व्यक्त केले…