
धुळ्यातील ‘त्या’ नर्सरीतील ४० हजार झाडे गेली कुठे?गौडबंगाल काय..? शिवसेना उबाठा चा सवाल
धुळे महानगरपालिकेच्या खाजगी जागेचा वापर करून नर्सरी चालवली जाते. थोडेफार नव्हे तर १५ ते २० फुटांपर्यंतची तब्बल ४० हजार झाडे वाढवली जातात.. तोपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला अचानक जाग येते.. या बाबत तक्रार होते. तत्कालीन जिल्हाधिकारी झाडे जप्त करण्याचा आदेश देतात.. मग ही झाडे तेथून नाहीशी होतात. उलट नर्सरी चालक कोर्टात धाव घेऊन दाद मागतात…