
निजामपूर नजीकच्या खुडाणेत वन्यप्राण्याने केले वासरू ठार
निजामपूर तालुक्यातील खुडाणे शिवारातील शेतमळयात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एक गिरगाईचे वासरू ठार झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार, 10 फेब्रुवारीच्या पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान घडली. शेतमालक दुल्लभ दयाराम माळी यांच्या शेतात असलेल्या गोठ्यात हा प्रकार घडला. पहाटे या घटनेची शेतमालकासह परिसरातील शेतकऱ्यांना माहिती मिळाल्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे. शेतमालक दुल्लभ माळी…