धुळे: नटराज टॉकीज लगत असलेल्या अन्सारी पुठ्ठा भंगार दुकानास अचानक आग लागल्याने संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. अधिक तपास प्रशासनाकडून सुरू आहे.
-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे