गुढीपाडवा व हिंदू नववर्षदिनानिमित्त श्रीराम मंदिर संस्थान साक्री, हिंदू जनजागरण समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत शहरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिर येथील नवीन ध्वज पूजनाने झाली. संस्थानचे अध्यक्ष श्रीकांतभाई भोसले आणि विजय भोसले यांच्या हस्ते हा विधी पार पडला. यानंतर श्रीराम मंदिरावरील ध्वज बदलण्यात आला. त्यानंतर संपूर्ण शहरात नववर्ष स्वागतार्थ भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम मंदिर संस्थानतर्फे ही शोभायात्रा काढण्यात आली. साक्रीतील सर्व मंदिरांवरील जुने ध्वज उतरवून नवीन ध्वज लावण्यात आले. तसेच गुढीपाडवा ते रामनवमी या नवरात्रोत्सव काळात श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार आहे.
या शोभायात्रेत श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्रीकांतभाई भोसले, साक्री नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. शोभायात्रेत प्रा. शशिकांत सुतार, सावन घुगे, बंडू गीते, धनराज चौधरी, सोमेश्वर हिरे, युवराज महाले, पराग चौधरी, वैभव बोरसे, विजय भोसले, विनोद पगारिया, योगेश चौधरी, सुनील देशमुख, सनी हिरे, दिनेश शिंदे, शुभम गौड, गजू सोनवणे यांसह असंख्य भाविकांचा सहभाग होता.
प्रतिनिधी निलेश सावळे
झेप मराठी साक्री