शिरपूर – निमगूळ येथील जवान महेश सोनवणे यांचे अपघाती निधन; संपूर्ण गावावर शोककळा

दोंडाईचा- (श. प्र.) निमगूळ ता. शिंदखेडा येथील रहिवासी सध्या शिरपूर (जि. धुळे) येथे वास्तव्यास असलेले आर्मी सिग्नल कोर यात हवालदार म्हणून मध्यप्रदेश महू ( इंदोर) येथे कार्यरत असलेले महेश युवराज सोनवणे हे सुटीवर आपल्या दुचाकीने शिरपूर येथे येत असताना दि. ६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास लवकी (ता. शिरपूर) जवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने ते जखमी झाले त्यांच्या हता पायाला व डोक्याला गंभीर जखमी झाल्याने त्यांना विरमरण आले. ते शिरपूर येथील करवंद नाक्याजवळ बालाजी नगर येथे वास्तव्यास आहेत त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली व एक २ वर्षाचा मुलगा आहे. महेश सोनवणे यांचे प्राथमिक शिक्षण निमगूळ ता. शिंदखेडा येथील प्राथमिक शाळेत व बा मा बागल हायस्कूल मध्ये झाले ते २००२ साली अर्मिमध्ये भरती झाले देश सेवा करत असताना त्यांनी जम्मू काश्मीर पंजाब याठिकाणी देशसेवा चोखपणे बजावली त्यांना हावलदर पदी बढती मिळाली होती. ते सध्या इंदोर जवळ महू येथे कार्यरत होते. निमगूळ गावातील मनमिळाऊ स्वभावाचे सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व महेश सोनवणे यांनी वीरमरण प्राप्त झाल्याने निमगूळ गावावर शोककळा पसरली. गावात महेश यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांचा अंत्यविधी उद्या दि. ७ रोजी १० वाजता शिरपूर येथे होणार आहे….

-प्रतिनिधी समाधान ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top