या वर्षी ईद शांततेत साजरी व्हावी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि गोहत्या रोखली जावी यासाठी पोलिस विभागाने व्यापक नियोजन केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खालील उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या:
- कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री बंद: प्रथमच धुळे, शिरपूर आणि साक्री येथील बाजार समित्यांमध्ये एक आठवड्यांसाठी जनावरांची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली.
- गावपातळीवर जनजागृती: सर्व गावांमध्ये पोलिस पाटलांच्या बैठक घेऊन त्यांना गोहत्या कायद्यासंदर्भात माहिती देण्यात आली.
- मुस्लिम धर्मगुरूंशी संवाद: पोलीस निरीक्षक, एसडीपीओ आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजातील प्रतिनिधींशी बैठका घेऊन कायद्याची माहिती दिली.
- १४ चेक नाके सक्रिय: जिल्ह्यात १० दिवसांपासून १४ चेक नाके कार्यान्वित करून गोतस्करीवर लक्ष ठेवण्यात आले.
- स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय: महापालिका व नगर परिषदांच्या बैठकीत विविध अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या — जसे की काळे मेनकापड, ट्रॅक्टरची संख्या वाढवणे, ड्रायव्हर्सना सतर्कता, पाण्याचे टँकर्स ठराविक भागात उपलब्ध ठेवणे इत्यादी.
- आधीच्या गुन्हेगारांवर कारवाई: पूर्वीच्या गोतस्करी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
- तडीपारी व शहर प्रवेशबंदी: यंदा प्रथमच काही गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले व शहर प्रवेश बंदी लावण्यात आली.
- संवेदनशील भागात बॅरिकेडिंग: तीन दिवस आधीपासून संवेदनशील ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले.
- ड्रोनद्वारे गोतस्करीवर नजर: संवेदनशील भागांमध्ये ड्रोनच्या मदतीने निरीक्षण करण्यात आले.
- सोशल मीडियावर नजर: अनावश्यक व भडकावू पोस्ट टाकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली.
- गोरक्षकांच्या इन्पुटवर तत्काळ कारवाई: कुणाही व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीवर पोलिसांनी त्वरित सत्यता तपासून कारवाई केली.
- खाजगी ड्रोनवर बंदी: कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खाजगी ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली.
- स्वच्छता व आरोग्य विभागाची बैठक: पशुवैद्यकीय अधिकारी, स्वच्छता व आरोग्य निरीक्षक यांच्याशी समन्वय साधण्यात आला.
- सशस्त्र फोर्सचा वापर: सीआरपीएफ, एसआरपीएफ, रॅपिड एक्शन फोर्स, होमगार्ड्स, आरसीपी यांचा प्रभावी बंदोबस्तासाठी वापर.
- सर्व पोलिस शाखांचा सहभाग: डीएसबी, एलसीबी, कंट्रोल रूम, वेलफेअर, सायबर, रीडर आदी नॉन-एक्झिक्युटिव्ह ब्रँचेसना बंदोबस्तात सहभागी करण्यात आले.
- पोलिसांची सुटी रद्द: डीजींच्या आदेशानुसार दोन दिवस आधीच सर्व पोलिसांची सुटी रद्द करण्यात आली होती.
- घंटागाड्यांसोबत पोलिस गस्त: प्रत्येक घंटागाडीबरोबर एक पोलिस बाईकही दिली गेली.
- गुड मॉर्निंग स्क्वॉड: पहाटे ४ वाजता धार्मिक स्थळे व पुतळ्यांची सातत्याने पाहणी केली जात होती.
- रूट मार्चचे नियोजन: १० दिवसांपासून रूट मार्च सुरू होते. अंतिम रूट मार्चमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा देखील सक्रिय सहभाग.
- सायंकाळी पायी पेट्रोलिंग: सायंकाळी ६ ते १० दरम्यान शहरासह गावांमध्ये पायी गस्त ठेवण्यात आली.
- बीडीडीएस व डॉग स्क्वॉड तपासणी: धार्मिक स्थळे व पुतळ्यांची सुरक्षा तपासणी बीडीडीएस व डॉग स्क्वॉडमार्फत करण्यात आली.
- मासांबाबत काम करणाऱ्यांशी संवाद: कसाई व खाटीक समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून कायद्याची माहिती दिली.
- झिरो टॉलरन्स धोरण: “झिरो टॉलरन्स पॉलिसी”अंतर्गत आजअखेर ७२ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले असून, ११५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.