धुळ्यात प्रांताधिकारी आणि उपजिल्हाधिकारी म्हणून सांभाळली जबाबदारी
राज्य शासनाच्या आदेशानुसार श्री. गणेश मिसाळ यांची अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली असून, त्यांची नियुक्ती पश्चिम उपनगरे, वांद्रे (अतिक्रमण निष्कासन) या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी दिनांक १० जून २०२५ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला.
याआधी त्यांनी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC), मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी म्हणून यशस्वीपणे तीन आठवडे कार्य केले. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी संवर्गात त्यांनी धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत विविध प्रशासनिक पदांवर जबाबदारी पार पाडली.
विशेष म्हणजे, आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी दोन वर्षे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून स्वेच्छेने सेवा बजावली. या काळात त्यांनी पुरवठा व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.
गेल्या १६-१७ वर्षांच्या प्रशासनातील सेवाकाळात श्री. मिसाळ यांनी लोकसंग्रह, पारदर्शकता आणि निष्ठेच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या पदोन्नतीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
झेप मराठी न्यूज मीडिया ग्रुपतर्फे श्री मिसाळ यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा.. !
