न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपयुक्त उपक्रमाचे आयोजन; मान्यवरांचे मार्गदर्शन

धुळे | प्रतिनिधी
धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनुजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूल, धुळे येथे आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता.

कार्यक्रम प्रसंगी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. महेशजी घुगरी, श्री. प्रविण बाफना, इंजि. चेतन पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एन. हलकारे, उपमुख्याध्यापिका सौ. जया जोशी आणि पर्यवेक्षक श्री. एस. व्ही. भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात श्री. प्रविण बाफना यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातील मूल्यमापन, वेळेचे व्यवस्थापन आणि मेहनतीचे महत्त्व यावर अनमोल मार्गदर्शन दिले. तसेच मुख्याध्यापक श्री. व्ही. एन. हलकारे यांनी समारोपाच्या वेळी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडून नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बी. एन. ठाकूर यांनी, स्वागत व परिचय श्री. एन. एल. ठाकूर यांनी केले. यादीवाचन श्री. ए. के. वानखडे सर यांनी केले. सूत्रसंचालन एच. डी. दराडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ. एम. आर. काकडे मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रंथपाल श्री. सतीश परदेशी आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top