धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण १० मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. कारवाईदरम्यान दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले असून, एकूण सुमारे ३ लाख २० हजार रुपयांच्या दुचाकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत.
कशी झाली कारवाई?
दिनांक २५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस यांना गुप्त बातमी मिळाली की, मोटारसायकल चोरी प्रकरणातील दुचाकी वस्मार गावात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती गंभीरतेने घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय साईनाथ तळेकर, एएसआय जितेंद्र आखाडे, तसेच पोलीस अंमलदारांचे पथक वस्मार गावात रवाना करण्यात आले.
गोल्या उर्फ आदिनाथ बोरसे ताब्यात
पथकाने वस्मार येथे सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे (वय २४, रा. देवपूर) याला एका चोरीच्या दुचाकीसह पकडले. पोलीसांनी विचारपूस केली असता त्याने आणि त्याच्या साथीदाराने – भरत सदा अहिरे (वय ३८, रा. वस्मार) – मिळून अजून ९ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे