राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या,अजीज शेख धुळे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

धुळे – राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, या प्रशासकीय बदल्यांमध्ये अजीज शेख यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या अजीज शेख हे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. त्यांची धुळे येथे बदली करण्यात आली असून त्यांनी लवकरच कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरु असून, महायुती सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय फेरबदलांचा धडाका सुरूच आहे.

अजीज शेख यांना धुळे जिल्ह्याचा याआधीचा अनुभव असून, ते याआधी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्याचा भौगोलिक आणि सामाजिक संदर्भ त्यांना चांगल्या प्रकारे परिचित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top