मेथी (ता. शिंदखेडा) येथे सुरू असलेल्या अनधिकृत खदानीविरोधातील आंदोलनादरम्यान आज 15 ऑगस्ट रोजी चार शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.
गेल्या 11 दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषण करत असून, कालच तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. आज स्वातंत्र्य दिनी उपोषणस्थळी भरत धोबी, जगदीश गोसावी, खुमानसिंग गिरासे आणि प्रेमसिंग गिरासे यांनी आत्मदहनासाठी पुढे सरसावले.
घटनास्थळी आधीपासूनच पोलीस बंदोबस्त असल्याने तातडीने कारवाई करण्यात आली. या दरम्यान पोलिस व आंदोलकांमध्ये लटापटीची स्थिती निर्माण झाली. अखेर शिंदखेडा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी शिंदखेडा पोलीस ठाण्यात नेले.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

