धुळ्यातील आई मरिमाता गणेश मंडळाच्या गणेश उत्सव 2025 सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

धुळ्यातील पेठभागातील प्रमुख मंडळांपैकी एक असलेल्या शिवनेरी चौकातील आई मरिमाता गणेश मंडळा तर्फे गणपती उत्सव 2025 साठी उभारण्यात येणाऱ्या भव्य सभामंडपाचे भूमिपूजन आज २१ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

या सोहळ्यास आझाद नगरचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, प्रख्यात वैद्यकीय तज्ञ डॉ. विनोद छाजेड, डॉ. डी. वाय. महाजन, डॉ. भूषण राव, तसेच पेठभागातील मान्यवर व्यापारी शरद शेठ पसारी, विजय काका चव्हाण, कैलास शेठ पसारी, महेश जी गुप्ता आणि अधिवक्ता शरद देशपांडे यांसारख्या मान्यवरांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व युवासेना विस्तारक तसेच उपजिल्हाप्रमुख कुणालभाऊ कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावर्षीच्या गणेश उत्सवाचे अध्यक्ष म्हणून कार्तिकभाऊ पाटील यांची निवड झाली आहे.

मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रामदासभाऊ कानकाटे, कैलास बापू मराठे, हरी काका वाघ, गोविंद आप्पा पाखले, नितीनभाऊ धात्रक, आबा काका लोखंडे, मनोजभाऊ धात्रक, कैलदीप काका कोठावदे, राजू काका धात्रक, भटु शेटे, सोनु कानकाटे, सागर गोरे, पै. सोमेश कानकाटे, अमीन शेख, गोपी चव्हाण, चेतन शिंदे, हर्षल साळुंखे, नैनेश ठाकूर, संकेत कोठावदे, कुमोद बागुल, उज्वल कोठावदे, बाबा नाईक, कुंदन प्रजापत, ओम कानकाटे, दुर्वेश चव्हाण, प्रीतम लोखंडे, शंतनू भडांगे, ऋषिकेश भडांगे, सौरभ कुटे, दर्शन सोनार, प्रेम कानकाटे, अजित शेख, सैफ शेख, कैफ शेख, हर्षवर्धन मराठे, मानस भडांगे, साई पोलादे, पार्थ वराडे, रणजीत मराठे, आरु भडांगे, सार्थक मराठे यांच्यासह मंडळातील असंख्य कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top