जैताणेतील संघशक्ती व्यायाम शाळेचे बॅनर फाडल्याप्रकरणी आरोपी निष्पन्न; निजामपूर पोलिसांची कारवाई

धुळे – जैताणे गावातील संघशक्ती सार्वजनिक व्यायाम शाळेचे बॅनर व सीसीटीव्ही कॅमेरा फाडून तोडफोड करणाऱ्या घटनेचा छडा निजामपूर पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.राकेश भिका शेवाळे, रा. जैताणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ६.३० या वेळेत भवानी मंदिराजवळील व्यायाम शाळेच्या परिसरात ही तोडफोड करण्यात आली. प्रकरणी निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ०२६३/२०२५ भादंवि कलम ३२४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, जैताणे येथील बापु पुंडलीक खैरनार (उर्फ बापु पैलवान) व अनिल शांताराम जाधव यांचे या प्रकारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासात इतर साथीदारांची नावेही उघडकीस आणली जाणार आहेत.या कारवाईसंदर्भात निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि. मयुर एस. भामरे यांनी आवाहन केले की, “या घटनेविषयी कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कायदा हातात घेऊ नये. सोशल मीडियावरील प्रत्येक बाबीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.”ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. आर. बांबळे, तसेच स्थगुशा धुळेचे पोनि. श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत निजामपूर पोलीस स्टेशनचे सपोनि. प्रियदर्शनी थोरात, पोउपनि. यशवंत भामरे, पोउपनि. मधुकर सोमासे, पोंउपनि. चंद्रकांत गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top