धुळे : भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने धुळे जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. १ ते ५ सप्टेंबरदरम्यान दररोज मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून ही शक्यता “अतिशय जास्त” असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
-प्रतिनिधि कार्तिक सोनवणे

