जैताणे येथील आदर्श विद्या मंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा

निजामपूर-साक्री तालुक्यातील जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने संपूर्ण शाळा विद्यार्थ्यांनी सांभाळली. कनिष्ठ महाविद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांनी तर माध्यमिक विद्यालयातील ८७ विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. कनिष्ठ महाविद्यालयातून ज्ञानेश्वरी सावंत प्राचार्य, दिपाली जाधव उपप्राचार्य व नंदिनी पवार उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. तर माध्यमिक विद्यालयात स्वरा मुसळे व नैतिक शाह मुख्याध्यापक, तसेच वैष्णवी पगारे व प्रणाली ठाकरे पर्यवेक्षक या भूमिकेत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक/प्राचार्य बी. आर. गावित उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैताली बच्छाव हिने केले. विद्यार्थिनी नंदिनी पवार, स्वाती बस्ते व सोनाली देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांमधून एस. एल. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्राचार्य ज्ञानेश्वरी सावंत तसेच विद्यार्थी अधिकाऱ्यांनीही आपले अनुभव सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य गावित यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला उपप्राचार्य ए. एस. भदाणे, उपमुख्याध्यापक एन. एम. शाह, पर्यवेक्षक एस. एस. शिरसाठ, यु. व्ही. मोरे, जेष्ठ शिक्षक बी. बी. जगदाळे, पी. एच. जाधव यांच्यासह सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयातून तेजस्विनी बच्छाव तर माध्यमिक विद्यालयातून वैष्णवी पगारे यांनी केले. आभार प्रदर्शन सोनल देवरे हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिती सदस्य व्ही. बी. येवले, पी. बी. पगारे, पी. के. बागुल, के. आर. चौरे, एस. एम. मोहने, एस. पी. जगताप, सी. ए. बोरसे यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी- हेमंत महाले, निजामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top